Wrestling competition | शाहू साखर कारखाना भरवणार कुस्ती स्पर्धा | Shahu Sakhar Karkhana |Sakal Media
कोरोना काळात थांबलेल्या कुस्ती स्पर्धांना (Wrestling competition)परत चालणा मिळावी या उद्देशाने श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत कागल जि. कोल्हापूर येथे ४ ते ६ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान ३५ व्या भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा विनाप्रेक्षक घेतल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून होणार आहेत. जिल्ह्यातील थांबलेली कुस्ती परत सुरु व्हावी यासाठी दै.सकाळने सतत भुमिका घेतली. या संदर्भात शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व महाराष्ट्र केसरी पै.अमोल बुचडे यांच्याशी खास बातचीत केलीय प्रतिनिधी मतीन शेख यांनी...
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
#Kolhapur #Wrestling #SamarjitSinghGhatge